Homeताज्या बातम्या

वळणमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या 

देवळाली प्रवरा :   राहुरी तालुक्यातील वळण गावात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल तीन बंद घरे फोडून परिसरात खळबळ उडवून दिली. पाथरे रोड व मांजरी रोड पर

मनमाड महामार्गावर एका भीषण अपघाताने तरुणाचा बळी 
महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन
ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड

देवळाली प्रवरा :   राहुरी तालुक्यातील वळण गावात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल तीन बंद घरे फोडून परिसरात खळबळ उडवून दिली. पाथरे रोड व मांजरी रोड परिसरातील घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सुरुवातीला एका घरातून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित प्रकारामुळे या चोरीला वेगळेच वळण मिळाले.वळण येथील पाथरे रोड परिसरातील संजय खुळे यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडले. घरातील कपाट व पेटीची उचकापाचक करून चोरट्यांनी रोकड व दागिन्यांवर डल्ला मारला. पेटी घराबाहेरील शेतात नेऊन फोडण्यात आली. देवघरातील रुख्मिणीच्या मूर्तीच्या गळ्यातील दागिन्यांना मात्र चोरट्यांनी हात लावला नाही.यानंतर चोरट्यांनी नानासाहेब खुळे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाची उचकापाचक केली. मात्र, कपाटातील दागिने बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी ते तसेच सोडून दिले.मांजरी रोडवरील प्रभाकर आढाव यांच्या बंद घराचेही कुलूप चोरट्यांनी तोडले. घरात शोधाशोध करूनही काही मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.एकाच रात्री तीन बंद घरे फोडल्याने वळण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, ठसे आणि श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन गावातील पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS