https://youtu.be/5XqNkPcLh9A मुंबईत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर FDAची कारवाई सुरूच आहे. आता मुंबईतील आणखी चार
मुंबईत अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर FDAची कारवाई सुरूच आहे. आता मुंबईतील आणखी चार हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.दादरमधील Eat Nino, अंधेरीतील जय माँ काली ढाबा, सांताक्रूझमधील हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि कुर्ल्यातील साऊथ इंडियन डोसा कॉर्नर यांचा या कारवाईत समावेश आहे.या हॉटेल्समध्ये अस्वच्छता, झुरळं, घरमाशांचा वावर आणि गंजलेली भांडी आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने नियमांचा भंग करणाऱ्या या आस्थापनांवर थेट कारवाई करत परवाने निलंबित केले आहेत.दरम्यान, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. मुंबईतील IIT बॉम्बे कॅम्पसमधील दोन कँटीनवरही कारवाई करत ती तात्काळ बंद करण्यात आली आहेत.तर बीडमध्येही FDAने मोठी कारवाई करत खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक करणाऱ्या पाच आस्थापनांवर छापे टाकले. या कारवाईत तब्बल 1 कोटी 94 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करून ती सील करण्यात आली आहेत.त्यामुळे आता अन्नाच्या गुणवत्तेशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर FDAचा बडगा कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

COMMENTS