Homeताज्या बातम्या

ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड

कर्जत : "ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय किंवा कौटुंबिक अत

कर्जत बाजार समितीत सोमवार-गुरुवारी नियमित लिलाव : तापकीर    
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण


कर्जत : “ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय किंवा कौटुंबिक अत्याचार झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिला.
 वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, सोपान कोपनर, सोपान तनपुरे, सदाशिव थोरात, बाबा भैलुमे, बाळासाहेब सुद्रिक, शेरखान पठाण, रामभाऊ सूर्यवंशी, गुलाब तनपुरे, बादशाह बागवान, खाजू बागवान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नुकताच कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या गायकवाड यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शब्बीर पठाण म्हणाले, की पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायांवर धडक कारवाई केली. तसेच कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील अनेक गरीब वृद्ध, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांवर कौटुंबिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याने अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  उत्तर देताना हनुमंत गायकवाड म्हणाले, की कर्जतमध्ये काम करताना प्रत्येकाला समान न्याय दिला जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. ज्येष्ठ नागरिकांवर कौटुंबिक अत्याचार किंवा छळ होत असल्यास त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा छळ किंवा अवमान कोणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS