Homeताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या पक्षनिधी संकलनासाठी पार्थ पवार आक्रमक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधी संकलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि आगाम

प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांचा उपरोधिक सवाल; नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, नेटवर्क नाही की नेतेच नाहीत?
नांदेड जिल्हाबॅकेच्या संचालकपदी बि आर कदम यांची निवडमतदार महाबळेश्वरला नेऊन सुद्धा एक मत फुटले
आ. शिवतारेंना मुलीने किडनी दान देत दिले नवजीवन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधी संकलनाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी आर्थिक तयारी सक्षम करण्याच्या उद्देशाने खासदार पार्थ पवार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या विविध उपक्रमांसाठी आवश्यक निधी नियमितपणे उपलब्ध राहावा यासाठी वरिष्ठ स्तरावर विशेष नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मंत्र्यांना तसेच आमदारांना पक्षनिधीसाठी ठराविक रक्कम जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मतदारसंघांच्या विकासासाठी उपलब्ध निधीतील काही हिस्सा संघटनात्मक कामकाजासाठी देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे. पक्षाच्या आर्थिक बळकटीसाठी लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते.

पक्षनिधी संकलनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधितांना कठोर संदेश दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही लोकप्रतिनिधींना पदाची जबाबदारी कायम राखण्यासाठी पक्षाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, असे संकेतही दिले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, पक्षाच्या आर्थिक आणि संघटनात्मक रचनेत अलीकडेच काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत विविध जबाबदाऱ्यांचे पुनर्वाटन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पार्थ पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस (National General Secretary) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS