Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात आता पशुरोग निदान प्रयोगशाळा

लातूर प्रतिनिधी - लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन व्हावी यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांना य

लातूरमध्ये होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती
देवदर्शन करुन परतताना ऑटोला ट्रकची धडक, एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू
लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; 60 कोटी 49 लाखांची वसुली

लातूर प्रतिनिधी – लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन व्हावी यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून मंगळवार दि. 13 जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा उभी राहणार आहे.
राज्यातील जवळपास प्रत्येक प्रादेशिक पशुसंवर्धन विभागामध्ये एक विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा आहे. पण, लातूरमधील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागासाठी अद्याप प्रयोगशाळा नाही. त्यामुळे लातूरमध्ये विभागीय प्रयोगशाळा मंजूर व्हावी यासाठी आमदार धिरज देशमुख प्रयत्नशील होते. त्यांच्या मागणीची दखल घेवून सरकारने लातूरमध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा मंजूर केली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. याबद्दल आमदार धिरज देशमुख यांनी राज्य सरकारचे आभार मानले. लातूरमधील प्रादेशिक पशुसंवर्धन कार्यालयाची स्थापना 2001 मध्ये झाली असून या विभागात लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली हे जिल्हे अंतर्भूत आहेत. या चार जिल्ह्यातील पशुंमधील रोग नमुने तपासणीसाठी औरंगाबाद अथवा पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये सादर केले जातात. येथे होणारी शेतक-यांची धावपळ टळावी म्हणून लातूरमध्ये पशुरोग निदान प्रयोगशाळा उभी रहावी, यासाठी आमदार धिरज देशमुख यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

COMMENTS