Homeताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी?महापौर रितू तावडे यांना ई-मेलवरून धमकी; पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर ब

  सिद्धिविनायकात 18 कोटींचा घोटाळा? सदा सरवणकरांचं मोठं स्पष्टीकरण; 19 कर्मचारी निलंबित, GPay रॅकेटचा खुलासा!
रेल्वे भरतीतून मराठीला डावलल्याचा आरोप; मनसेचा इशारा, अमित ठाकरे यांचा आंदोलनाचा इशारा
आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल
गाडी, कॅबिनसह तुला… मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या  ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर


मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. या संदेशात मुंबईतील मेट्रो सेवा, शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करण्याचा दावा करण्यात आल्याचे समोर आले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या संदेशात स्वातंत्र्यदिनापूर्वी स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच काही फुटीरतावादी विचारसरणीचा संदर्भ देत प्रक्षोभक मजकूर लिहिल्याचेही सांगितले जात आहे. नागरिकांनी मुलांना शाळेत पाठवू नये आणि मेट्रोने प्रवास टाळावा, अशा आशयाचाही उल्लेख या संदेशात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. संदेश कोठून पाठविण्यात आला, त्यामागील व्यक्ती अथवा गट कोणता आहे, याचा शोध सायबर शाखेमार्फत घेतला जात आहे. संदेशाचा उगम, तांत्रिक तपशील आणि संबंधित पुरावे तपासले जात असून, सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर संवेदनशील परिसरात पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. महापौर रितू तावडे यांना यापूर्वीही धमकीचे संदेश प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणाकडेही पोलिस गंभीरतेने पाहत असून, सर्व शक्य बाबींची चौकशी केली जात आहे.

COMMENTS