Homeताज्या बातम्या

संविधानापेक्षा मनोज जरांगे मोठे नाहीत : सदावर्ते

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्मा

शिर्डीतील शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८० टक्के समाजकारणावर भर
झुंबरबाई घोलप यांचे निधन
गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असून, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, संविधानाच्या चौकटीत सर्वांनी वागले पाहिजे आणि कोणाच्याही अपमानाचे समर्थन होऊ शकत नाही, असे सांगत जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावरही त्यांनी प्रश्‍न उपस्थित केले.
सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्याविषयी वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून ती केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर ओबीसी समाजासह इतर घटकांचाही अपमान असल्याचे त्यांचे मत आहे. संविधान लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिक समान असून, कोणालाही कायद्यापेक्षा मोठे समजता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सदावर्ते यांनी मंत्री उदय सामंत यांनी संबंधित वक्तव्याच्या वेळी हस्तक्षेप का केला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. एका नेत्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली गेल्यानंतर त्यावर मौन का बाळगले गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातप्रमाणपत्रे मिळाल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाही अपात्र असूनही लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव मंजूर करून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणीही सदावर्ते यांनी केली. तसेच या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी संविधानाच्या चौकटीचा आदर राखण्याचे आवाहन केले. कोणत्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही आणि आवश्यक तेथे कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS