Homeताज्या बातम्या

मिसिंग लिंकवरील अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत आणखी तिघे ज

भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
सोशल मीडियाच्या वादातून हल्ला
तळेगाव एमआयडीसीतील दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू
Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू | Navarashtra


मुंबई : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत आणखी तिघे जण किरकोळ जखमी होऊन बचावले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कार आणि मालवाहू टेम्पो या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीनंतर दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी भरधाव कार बोगद्यात पुढे जात असलेल्या भाजीपाला वाहतूक करणार्‍या मालवाहू टेम्पोवर जोरात आदळली. धडकेनंतर दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात तुषार भूमकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील सर्व प्रवासी पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव सुमारे दोन तासांसाठी बंद करण्यात आली. या काळात वाहनांना जुन्या मार्गाने वळविण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला. महामार्ग पोलीस, रस्ते व्यवस्थापन पथक तसेच आपत्कालीन मदत पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर दोन्ही वाहने बाजूला केल्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास महामार्ग पोलीस करीत असून प्राथमिक तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

COMMENTS