Homeताज्या बातम्या

खंडवा स्थानकावर काचेगुडा-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेसला प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा

नांदेड: प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या काचेगुडा-श्रीगंगानगर-काचेगुडा साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेच्या खंडवा (केएनडब्ल्यू) रेल्

विनयभंग करणारा आरोपी पुण्यातून जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; एक महिन्यानंतर जेरबंद  
एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
मिरजजवळ काळीज हेलावणारा अपघात! भरधाव कार थेट उभ्या ट्रकमध्ये घुसली; वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
Khandwa to Hazur Sahib Nanded Long-Distance Trains, Shortest Distance: 494  km - Railway Enquiry

नांदेड: प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या काचेगुडा-श्रीगंगानगर-काचेगुडा साप्ताहिक एक्सप्रेसला मध्य रेल्वेच्या खंडवा (केएनडब्ल्यू) रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा थांबा कायम राहणार असून, यामुळे खंडवा व परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १७६०१ काचेगुडा-श्रीगंगानगर साप्ताहिक एक्सप्रेससाठी हा थांबा २५ जुलै २०२६ पासून, तर गाडी क्रमांक १७६०२ श्रीगंगानगर-काचेगुडा साप्ताहिक एक्सप्रेससाठी २८ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.

खंडवा स्थानकावरील वेळापत्रक

गाडी क्रमांक १७६०१ खंडवा येथे दुपारी ३.३२ वाजता दाखल होऊन ३.३५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. तर गाडी क्रमांक १७६०२ दुपारी १.३२ वाजता खंडवा येथे पोहोचून १.३५ वाजता पुढे प्रस्थान करेल.

या प्रायोगिक थांब्यामुळे खंडवा तसेच आसपासच्या भागातील प्रवाशांना काचेगुडा व श्रीगंगानगर दरम्यानच्या प्रवासासाठी अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS