Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोधवडे येथे शाळा पूर्व तयारी पालक सभा उत्साहात

लोधवडे : शाळा पूर्व तयारीसाठी उपस्थित विद्यार्थी, शाळा समिती व ग्रामस्थ. गोंदवले / वार्ताहर : आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता-पहिलीच्या व

प्राक्तन पांडव प्रथम, ओंकार गुरव द्वतीय, कविता व स्वाती लोनबळे तृतीयराज्यस्तरीय ओबीसी सत्यशोधक परीक्षेचा निकाल जाहीर
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराविरोधात चौथा गुन्हा दाखल
कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

गोंदवले / वार्ताहर : आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता-पहिलीच्या वर्गात येणारी मुले ही शारीरिक, बौध्दिक, सामाजिक, भाषिक, भावनिक आणि गणनपूर्व तयारीने पुढील शिक्षण ज्ञान ग्रहणतेसाठी सक्षमपणे तयार होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा, फलटण डाएट आणि पंचायत समिती माण शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे, ता. माण, जि. सातारा येथील प्राथमिक शाळेत पहिली शाळा पूर्व तयारीच्या माता-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाजत-गाजत वाद्यवृंदाच्या गजरात आनंदमय वातावरणात प्रभात फेरी काढून नवागत बालक, प्रमुख मान्यवर पाहुणे आणि पालक यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शाळा द्वारी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. शैक्षणिक गुढी हे या पालक सभेचे खास आकर्षण होते. नवागत बालकांच्या हाती रंगीबेरंगी फुगे देण्यात आले होते. नवीन शाळेत येणारी मुले अगदी हारखून आणि आनंदून गेली होती. यावेळी सात विविध प्रकारच्या स्टॉलची आकर्षक अशी मांडणी करण्यात आली होती. नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौध्दिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषिक विकास, गणन पूर्व तयारी, माता पालक मार्गदर्शन आणि कार्ड वितरण, यानुसार क्रमाने स्टॉल लावण्यात आले होते. या सर्व स्टॉलवर माहिती आणि कृती कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि अंगणवाडी ताई उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नवागत विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. या नवागत विद्यार्थी व माता पालक मेळाव्याच्या समारंभाचे स्वागत व सूत्रसंचलन सतेशकुमार मारुती माळवे यांनी केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार माने, मुख्याध्यापक दिपक ढोक, रामदास जाधव, रेश्मा साळुंखे यांंनी मनोगत व्यक्त केले.
या शैक्षणिक कार्यक्रमासाठी लोधवडेचे सरपंच आप्पासो जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार माने, उपाध्यक्ष शुभांगी चोपडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भागवत काशिद, रेश्मा साळुंखे, रामदास जाधव, श्रीकांत काळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होती. याशिवाय मुख्याध्यापक दिपक ढोक, शिक्षक दिपक कदम, सतेशकुमार माळवे, संतराम पवार, सुचिता माळवे, दीपाली फरांदे, अश्‍विनी मगर, अंगणवाडी ताई, अर्चना माने, सुरेखा पाटील, विद्या कदम, पूनम अवघडे, पुष्पा जाधव व सर्व अंगणवाडी मदतनीस तसेच अनेक माता पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पालक मेळाव्यास आपली उपस्थिती लावली. लोधवडे गावच्या प्राथमिक शाळेतील शाळा पूर्व तयारी माता पालक मेळाव्याच्या यशस्वीतेबद्दल माणचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत, शिक्षण विस्ताराधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी भरभरुन कौतुक केले. शेवटी संतराम पवार यांनी या माता पालक व विद्यार्थी मेळाव्यातील उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS