श्रीरामपूर : पेन्शन हा सेवानिवृत्त सेवकांचा सर्वात मोठा जीवनाधार आहे, या सेवानिवृत्तींचे प्रश्न सोडविण्यातच संघटनेचे ध्येय आहे, असे विचार रिटायर्

श्रीरामपूर : पेन्शन हा सेवानिवृत्त सेवकांचा सर्वात मोठा जीवनाधार आहे, या सेवानिवृत्तींचे प्रश्न सोडविण्यातच संघटनेचे ध्येय आहे, असे विचार रिटायर्ड प्रोफेसर वेलफेअर, एज्युकेशनल ॲण्ड सोसल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. एन. जाचक यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर येथील सभागृहात रिटायर्ड प्रोफेसर्स वेलफेअर, एज्युकेशनल ॲण्ड सोसल ट्रस्टने वार्षिक बैठकीचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी डॉ. एम. एन. जाचक बोलत होते. २०२६ संघटना स्मरणिकेचे सहसंपादक व संयोजक माजी प्राचार्य विश्वासराव काळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पदाधिकारी व उपस्थितांचा परिचय करून दिला. यावेळी ८० वर्ष व अधिक वय असलेल्यांचा सत्कार करण्यात आला, त्यामध्ये माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य विश्वासराव काळे, प्राचार्य रामराव शेरकर, डॉ. विक्रम दाभाडे इत्यादींचा शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेची २०२६ स्मरणिका सर्वांना देण्यात आली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘अमृतमंथन’, ‘वाचता वाचता’,’ जीवन हे अनमोल’ ही पुस्तके पदाधिकारी यांना देऊन त्यांचा सन्मान केला.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अनेकांना पुस्तके भेट दिल्यानंतर प्राचार्य विश्वासराव काळे यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, डॉ. उपाध्ये यांची सर्व पुस्तके अनुभवातून लिहिलेली आहेत, ती पुस्तके जीवनप्रेरक आहेत. अध्यक्ष जाचक व इतर पदाधिकारी यांना पुस्तके देताना प्राचार्य काळे म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीरामपुरात प्रभावी वाचन संस्कृती रुजविली आहे. त्याबद्दल कौतुक केले.
माजी प्राचार्य डॉ. गोरख बारहातेसह अनेकांनी विविध प्रश्न मांडले. त्यावर डॉ. जाचक यांनी सविस्तर निवेदन केले. प्राचार्य विश्वासराव काळे, स्मरणिका कार्यकारी संपादक डॉ. बाळासाहेब गुंजाळ, सहसंपादक प्रा. एच. आर. देवचके, पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी डेंगळे, संघटनेचे खजिनदार प्रा. के. के. हरक इत्यादींनी नियोजनात भाग घेऊन सर्व सदस्यांनी अध्यक्ष जाचक यांच्या सेवाभावी कार्याबद्दल सत्कार केला. माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरेसह अनेक सभासद उपस्थित होते. प्रा. डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले.

COMMENTS