Homeताज्या बातम्या

शाळेची इमारत मोडकळीस आल्याने वर्षभरापासून विद्यार्थी झाडाखाली; माजलगाव तालुक्यातील काळेगाव थडी येथील धक्कादायक प्रकार

माजलगाव: तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्र अंतर्गत काळेगाव थडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत मोडकळीस आली असून ती कधीही कोसळण

कर्नाटकात आढळले ७००० विद्यार्थी एचआयव्ही बाधित; सरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती मोहीम
NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
सौ. के. एस. के. (काकू) महाविद्यालयात विद्यार्थी संसद २०२६-२७ स्थापन; नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन

माजलगाव: तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण केंद्र अंतर्गत काळेगाव थडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत मोडकळीस आली असून ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या वर्षभरापासून येथील विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

शाळेच्या नवीन इमारतीसाठी किंवा दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकांनी वारंवार केली आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऐन पावसाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांतही विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी शाळेच्या दुरुस्तीसाठी व नवीन खोलीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

COMMENTS