Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये सावित्रीच्या लेकींनी महात्मा फुलेंना केले अभिवादन !

कर्जत : वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान व अभीवादन करून कर्जत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जय ज्योती जय क्रांती च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने कर्जत शहरातील महात्मा फुले चौकात महात्मा फुले जयंती भव्य देखावा उभारण्यात आला होता, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे  महिलांना विविध क्षेत्रात संधी मिळाली यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपती, पोलीस, न्यायाधीश, शास्तज्ञ, सैन्यदल, वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात महिलांना उपलब्ध झालेल्या संधीचा देखावा सादर करण्यात आला होता. तसेच महात्मा फुले चौक या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या समता ध्वजाची यावेळी पूजा करण्यात आले तसेच सर्वांनी अभिवादन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. महात्मा फुले जयंतीनिमित्त कर्जत येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते १३९ जणांनी रक्तदान केले, सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहीनी सचिन घुले,  माजी नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत,  माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका हर्षदा काळदाते, अश्विनी गायकवाड, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत,  भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे, कोरेगावचे माजी सरपंच शिवाजीराव फाळके, , तालुकाध्यक्ष शरद म्हेत्रे, महात्मा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय आगम, सचिव मंगेश शिंदे, खजिनदार स्वप्नील गोरे यांच्यासह सदस्य व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना जपा : माजी मंत्री थोरात
किनवटमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी;पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन
बेलापूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम

कर्जत : वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान व अभीवादन करून कर्जत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जय ज्योती जय क्रांती च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने कर्जत शहरातील महात्मा फुले चौकात महात्मा फुले जयंती भव्य देखावा उभारण्यात आला होता, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक धोरणामुळे  महिलांना विविध क्षेत्रात संधी मिळाली यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपती, पोलीस, न्यायाधीश, शास्तज्ञ, सैन्यदल, वैद्यकीय, शिक्षण क्षेत्रात महिलांना उपलब्ध झालेल्या संधीचा देखावा सादर करण्यात आला होता.

तसेच महात्मा फुले चौक या ठिकाणी उभा करण्यात आलेल्या समता ध्वजाची यावेळी पूजा करण्यात आले तसेच सर्वांनी अभिवादन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

महात्मा फुले जयंतीनिमित्त कर्जत येथील श्री संत सावता महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते १३९ जणांनी रक्तदान केले, सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहीनी सचिन घुले,  माजी नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत,  माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका हर्षदा काळदाते, अश्विनी गायकवाड, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत,  भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे, कोरेगावचे माजी सरपंच शिवाजीराव फाळके, , तालुकाध्यक्ष शरद म्हेत्रे, महात्मा फुले उत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय आगम, सचिव मंगेश शिंदे, खजिनदार स्वप्नील गोरे यांच्यासह सदस्य व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS