Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फसवणूक करणारे ते मिस्टर नटवरलाल : खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर

फलटण / प्रतिनिधी : दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन त्यांनी दोन ते तीन बँकाना तारण ठेवलेली

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद
सातारच्या मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेस परवानगी; 100 विद्यार्थ्यांना मिळणार एमबीबीएसला प्रवेश
मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत

फलटण / प्रतिनिधी : दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन त्यांनी दोन ते तीन बँकाना तारण ठेवलेली आहे. दिगंबर आगवणे याने अनेकांची फसवणूक केली असून फसवणूक करणारे ते मिस्टर नटवरलाल आणि मोठा भामटा आहे. लवकरच त्याच्या फसवणुकीचा सातबारा बाहेर काढणार आहे, असा इशारा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.
सुरवडी, ता. फलटण येथील हॉटेल निसर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.
चांगला मुलगा म्हणून दिगंबर आगवणे यांना आपण तालुक्यात पुढे आणले त्यांना मदत केली त्यांना निवडणुकीला तिकीट दिले त्यांना आमदारकीला जी मते मिळाली ती फक्त आणि फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळेच आगवणे यांना मिळालेली आहेत. साखरवाडी येथील एकच जमीन दोन ते तीन बँकाना तारण ठेवलेली आहे. त्यामुळे विविध बँका अडचणीत आलेल्या आहेत. दिगंबर आगवणे यांनी विविध बँकाना यापूर्वीच फसवले आहे. रिव्हॉल्वरच्या जोरावर धमक्या दिल्या आहेत. अमीर शेख तसेच अनेक माणसे आणि पत्रकारांचीही दिगंबर आगवणे यांनी फसवणूक केल्याने आपण दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्याशी संबंध तोडले होते. पूर्वी जी मदत आगवणे यांना केली होती, ती चांगल्या भावनेनेच मदत केलेली आहे, असेही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दिगंबर आगवणे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे, खोटे आहेत. दिगंबर आगवणे यांना जे पैसे दिलेले आहेत ते चेकने किंवा बँकेच्या द्वारेच दिले आहेत. सर्व कागदोपत्री पुरावे आपणाजवळ आहेत, दिगंबर आगवणे यांना यापूर्वी स्वराज पतसंस्थेमधून कर्ज दिले होते. त्यावेळी आगवणे यांना पुन्हा पैशाची गरज भासल्याने त्यांनी पुन्हा नव्याने कर्ज काढले व त्यावेळी जुने कर्ज भरले. आगवणे यांच्या कर्जाचा कधीही हप्ता आम्ही भरलेला नव्हता व नाही, असेही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आगवणे ज्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेले होते. त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कर्जाचा उल्लेख केलेला आहे. तसेच त्या कर्जासाठी त्यांनी तारण सुध्दा ठेवलेले होते. ते कर्ज बोगस कर्ज कसे होईल, असा सवाल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
दिगंबर आगवणे यांच्याकडून मला साधारण आठ कोटी येणे आहेत. त्यामुळे त्यांचे सुमारे दोन कोटी होल्ड केलेले आहेत. आठ कोटीमधुन दोन कोटी वजा करता सुमारे सहा कोटी त्यांच्याकडून येणे आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेली आहे, असेही खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
दिगंबर आगवणे मदतीचा जाणीव ठेवणारा मनुष्य नाही. त्यामुळे त्याला पडद्यामागून जो कोणी मदत करत असेल त्याला आगवणेचा भविष्यात हिसका कळेल. हा माणूस विश्‍वास ठेवण्याचा लायकीचा नाही. फसवणुकीतला तो मोठा भामटा आहे, असेही खासदार रणजीतसिंह यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS