Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर

कर्जत : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, अहिल्यानगर दक्षिण जिल्हा स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांची निवड करण्यात आली आहे.  भाजपच्या वतीने दरवर्षी ६ एप्रिल हा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जातो. यंदाही राज्यभर हा दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार जिल्हानिहाय संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी प्रसाद ढोकरीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  ढोकरीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून १९९० पासून विश्व हिंदू परिषदेत कार्यरत आहेत. तसेच भाजपच्या जिल्हा व तालुका स्तरावरील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी सांभाळल्या आहेत. निवडणुकांचे नियोजन तसेच पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन त्यांनी यशस्वीपणे केले आहे.  पत्रकार परिषदेत बोलताना ढोकरीकर यांनी सांगितले की, स्थापनेदिनी विविध कार्यक्रमांद्वारे पक्षाचा इतिहास, विचारधारा व शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ६ ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील २१ मंडळांमध्ये व प्रत्येक बूथ स्तरावर ध्वजारोहण, कार्यालय सजावट, मिठाई वाटप तसेच कार्यकर्ता संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत.  या निवडीबद्दल त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने पक्ष कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी  
गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश

कर्जत : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, अहिल्यानगर दक्षिण जिल्हा स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांची निवड करण्यात आली आहे.

 भाजपच्या वतीने दरवर्षी ६ एप्रिल हा स्थापना दिवस उत्साहात साजरा केला जातो. यंदाही राज्यभर हा दिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार जिल्हानिहाय संयोजकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी प्रसाद ढोकरीकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

 ढोकरीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून १९९० पासून विश्व हिंदू परिषदेत कार्यरत आहेत. तसेच भाजपच्या जिल्हा व तालुका स्तरावरील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यापूर्वी सांभाळल्या आहेत. निवडणुकांचे नियोजन तसेच पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे व्यवस्थापन त्यांनी यशस्वीपणे केले आहे.

 पत्रकार परिषदेत बोलताना ढोकरीकर यांनी सांगितले की, स्थापनेदिनी विविध कार्यक्रमांद्वारे पक्षाचा इतिहास, विचारधारा व शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. ६ ते १२ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील २१ मंडळांमध्ये व प्रत्येक बूथ स्तरावर ध्वजारोहण, कार्यालय सजावट, मिठाई वाटप तसेच कार्यकर्ता संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत.

 या निवडीबद्दल त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने पक्ष कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

COMMENTS