कर्जत : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. सी. डी. मायी कृषीतज्ज्ञ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सन्मानानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजेंद्र पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे, माती परीक्षण, ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, शेतीतील नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले असून त्याचा मोठा लाभ कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनाही झाला आहे. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, माती व पाणी व्यवस्थापन, कृषी मार्गदर्शन शिबिरे, महिला बचतगटांचे सक्षमीकरण, कृषी उद्योजकता आणि विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षण अशा अनेक उपक्रमांमुळे या भागातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे.यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, ज्येष्ठ कृषी पत्रकार सुधीर भोंगळे, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि श्रीराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.राजेंद्र पवार यांना मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे कर्जत-जामखेडसह संपूर्ण कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

COMMENTS