Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जैवविविधता जपणे हि खरी गरज-डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड; राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते-आनंद गायकवाड

केज : स्वानंद सार्वजनिक वाचनालय व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आनंदगांव ता. केज जि. बीड येथे दिनांक22 मे 20 26 रोजी जागतिक जैवविविधता दिन व राजा

सुट्टीत आजोळी आलेल्या तरुणाने केला मामाच्या दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार ; केज तालुक्यात महिला अत्याचाराची आठवड्यातील तिसरी घटना
केजमध्ये व्हॉलीबॉलचा धडाका! अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य स्पर्धा
सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

केज : स्वानंद सार्वजनिक वाचनालय व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण आनंदगांव ता. केज जि. बीड येथे दिनांक22 मे 20 26 रोजी जागतिक जैवविविधता दिन व राजा राममोहन रॉय जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेला रावसाहेब जाधव व संभाजी लवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले. त्यानंतर जैवविधिता आणि अन्नसाखळी या विषयावर कार्यशाळा घण्यात आली.
या कायशाळेत दोन्ही संस्थांचे संस्थापक, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड विचार मांडले. नदी, जंगल, समुद्र, पर्वत, वातावरण आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीव हे जैवविविधता साखळीतील घटक आहे. आज हि जैवविविधतेची साखळी भौतिक सुविधेसाठी तोडली जात आहे. अगदी औद्योगिक वसाहतीसाठी, रस्त्यासाठी जंगले तोडली जात आहेत. यामुळे मानवी हव्यासामुळ नैसर्गिक अन्नसाखळी खंडीत होत आहे. यामुळेच वातावरण बदलला आपणाला सामोरे जावे लागत आहे. छोट्या – मोठ्या जिव जंतुलाही माणूस संपवत निघालेल आहे. पण माणसालाच कळत नाही कि या विनाशाच्या वाटेवर आपणही संपत चाललो आहेत. फक्त पैसा हिच संपत्ती नाही तर सगळ्यात मोठी संपत्ती निसर्ग आहे, निसर्गाला आव्हाण देण्याचे काम सामाण्य माणसापासून शासकीय यंत्रणा, शासन वेगवेगळया भौतिक सुविधांसाठी करीत आहे. यात आपण स्वतः संपणार आहोत याची जाण मात्र कुठेही दिसत नाही. जैवविविधता व अन्न साखळीला बाधा आणून आपण आपल्या पदरी दुः ख, निराशा व घोर संव्हार करत आहोत याची जाणीव माणसाल होणे गरजेचे आहे. निसर्गचक्र निसर्गाच्या पद्धतीने चालले तरच निसर्गातील जैवविविधता राखली जाईल व अन्न साखळी सुरजीत राहिल जेणेकरन प्रत्येक जीवाचे जगणे सुकर होईन याची जाण होणे व सजगपणे जैवविविधता  जपणे निसर्गातील अन्न साखळी जशी आहे तशी नैसर्गिक दृष्ट्या चालू देणे काळाची गरज आहे. अन्यथा जीवन जगने मुश्कील आहे. यासाठी मानसाने काही उपाययोजना कराव्यात.. जलसाठे व जलस्तोत्र स्वच्छ ठेवणे. सेंद्रिय सेतीला चालना देणे. जंगलतोड रोखणे, मोठ्या संखेने व मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करणे, पर्यावरण जनजागृती करणे, प्लास्टीकचा वापर टाळणे, तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याची अमलबजावणी करणे म्हणजेय इतर जीवाचेंही रक्षण करणे महत्वाचे आहे. जैवविविधता पर्यावरण च नाही तर अर्थव्यवस्थेसाठीही महत्वाची आहे. शेती, औषध निर्मिती, पर्यटन व वन उद्योग, मत्स्य व्यवसाय व इतरही अनेक बाबींसाठी जैवविविधतया फायदा आहे. निसर्ग वाचवा, जैवविविधता जपा हा संदेश प्रत्येक घरात गेला पाहिजे. तसेच कचर्याचे वर्गीकरण करने गरजेचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करने, झाडे लावणे, प्लॅस्टिकचा वापर थांबविणे, निसर्गाचे मनातून संवर्धन करणे संत तुकाराम महारांजांनी म्हटल्या प्रमाने वृक्षवल्ली आम्ह सोयरे वनचरे असा शास्वत विचार घराघरातून होने आवश्यक आहे, अन्यथा निसर्ग आपल्यावर आता ही थोडाबहुत कापायलाय भविष्यात मानसाच्या अंगी शहाणपणा नाही आल्यास पृथ्वी मसणवठा ( स्मशान भुमी) बनायला वेळ लागणार नाही. म्हणून तरी जैवविविधता जपणे आपली, काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. राजा राममोहन रॉय सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रणेते व भाग्यविधाते होते असे प्रतिपादन आनंद भैय्या गायकवाड यांनी  व्याख्यान देताना केले. कार्यक्रमाला संजय सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते. कार्यक्रमाला वाचक, विद्यार्थी, युवक, जेष्ठ नागरीक यांची उपस्थिती होती.

COMMENTS