उपोषण केल्याच्या रागातून पाच एकर ऊस पेटविला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपोषण केल्याच्या रागातून पाच एकर ऊस पेटविला

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील औटीवाडी येथे वडिलोपार्जित जुना वाडा पाडण्याच्या कारणावरुन कोर्टातील चालू असलेला वाद तसेच काळभैरव पाणी वापर

कोपरगाव तालुक्यात 26 सरपंच पदासाठी 85 उमेदवार रिंगणात
डॉ. काळे करणार दर मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी
अहमदनगर : एकाच दिवसात झाले 1338 कोरोना बाधित ; कोरोनाचा विस्फोट

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील औटीवाडी येथे वडिलोपार्जित जुना वाडा पाडण्याच्या कारणावरुन कोर्टातील चालू असलेला वाद तसेच काळभैरव पाणी वापर सहकारी संस्था औटेवाडी या संस्थेच्या गैरप्रकाराची चौकशी व्हावी म्हणून उपोषणाला बसल्याच्या कारणावरून मनात राग धरुन शेतातील 5 एकर पेटवून देऊन नुकसान केल्याची घटना श्रीगोंदा येथे घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकासह तीनजणांविरुध्द राजेंद्र संपत औटी (वय 50) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, औटीवाडी येथील राजेंद्र संपत औटी यांचा माजी नगरसेवक अंबादास औटी आणि इतरांशी वडिलोपार्जित जुना वाडा पाडण्याच्या कारणावरुन कोर्टात वाद चालू आहे. तसेच काळभैरव पाणी वापर सहकारी संस्था औटेवाडीमधील गैरप्रकाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी विरोधात राजेंद्र औटी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. याचा राग मनात धरुन दि. 24 फेब्रुवारी रोजी औटेवाडी येथील गट नं. 1344/1 व शेत गट नं. 1344/2 मधील राजेंद्र औटी आणि साक्षीदार यांचा सुमारे 5 एकर ऊस पेटवून दिला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक पती अंबादास बन्शी औटी, आण्णा रुपचंद औटी, परशुराम बापू औटी, भाऊसाहेब दादाराम औटी (सर्व रा. औटेवाडी, ता. श्रीगोंदा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार व्ही. एम. बडे करीत आहेत.

COMMENTS