Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यात इंधनाचा ‘दुष्काळ’ गंभीर!; आगाऊ पैसे भरूनही पेट्रोल-डिझेल मिळेना; शेती व वाहतूक संकटात

केज : बीड जिल्ह्यातील केज शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभ

सूरतसारखी गॅसटंचाई मुंबई-पुण्यात होऊ नये ?रोहिणी खडसे यांचा राज्य सरकारला इशारा
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
अकोले तालुक्यात पेट्रोल पंप चालकांच्या अजब नियमामुळे खळबळ; शेतकऱ्यांना डिझेलसाठी आता ‘सातबारा’ द्यावा लागणार? अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल!

केज : बीड जिल्ह्यातील केज शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकत आहेत. परिणामी वाहनधारक, शेतकरी आणि वाहतूकदार यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इंधन वितरण करणार्‍या तेल कंपन्यांनी पंपचालकांना दिलेली पाच दिवसांची पत मर्यादा (क्रेडिट लिमिट) अचानक बंद केली आहे. जागतिक स्तरावरील तणाव आणि पुरवठा साखळीतील बदलांचा हवाला देत कंपन्यांनी आता संपूर्ण रक्कम आगाऊ भरण्याची अट लागू केली आहे. या निर्णयामुळे पंपचालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असून, वेळेवर टँकर उपलब्ध न झाल्याने पुरवठा व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला आहे.  केज शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. काही ठिकाणी इंधनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, तासनतास प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असतानाच डिझेलअभावी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. ट्रॅक्टर व पंपसेट बंद पडले आहेत सिंचन कामे ठप्प झाली आहेत शेतीची कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतमाल बाजारात नेण्यास अडचण निर्माण झाली आहे  इंधन टंचाईमुळे मालवाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा उशिरा होत असल्याने आगामी काळात बाजारात दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासगी वाहने, रिक्षा व मालवाहू वाहनांचे चाके थांबल्याचे चित्र दिसत आहे. पंपचालकांनी तेल कंपन्यांकडे लाखो रुपयांचे आगाऊ पैसे जमा करूनही वेळेवर इंधन मिळत नसल्याची तक्रार केली आहे. पुरवठा वेळेत न झाल्याने ग्राहकांचा रोष त्यांच्यावर ओढवला जात असून परिस्थिती हाताळणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पैसे भरूनही टँकर वेळेवर येत नाहीत. ग्राहकांना काय उत्तर द्यायचे हेच समजत नाही, अशी व्यथा एका पंपचालकाने व्यक्त केली. पंपांवर इंधन मिळत नसल्याने नागरिक व कर्मचार्‍यांमध्ये वादाचे प्रसंग वाढले आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी शासनाने आणि पेट्रोलियम मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी इंधन विक्रेत्यांच्या संघटनेने केली आहे. तेल कंपन्यांना पुरवठा सुरळीत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अन्यथा संपूर्ण वाहतूक व शेती व्यवस्था कोलमडण्याचा धोका असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS