Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री झिरवाळांचा खासगी सचिव कार्यमुक्त

डॉ. रामदास गाडे यांची मूळ विभागात बदली; लाचखोरी प्रकरणानंतर तत्काळ निर्णय मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील ल

राहुरी तालुक्यातील टेलरच्या हत्येप्रकरणी आरोपी गजाआड
नवी मुंबई महानगरपालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट
वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा

डॉ. रामदास गाडे यांची मूळ विभागात बदली; लाचखोरी प्रकरणानंतर तत्काळ निर्णय
मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणानंतर तातडीचा निर्णय घेत आपल्या खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेत परत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन खात्यातील एका लिपिकाला 50 हजार रुपयांच्या लाचेपैकी 35 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली होती. संबंधित कर्मचारी सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान त्याने काही अधिकार्‍यांची नावे घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयातच घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, या प्रकरणाशी आपला थेट संबंध आढळल्यास स्वतःहून पदत्याग करू, अशी भूमिका झिरवाळ यांनी स्पष्ट केली होती. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गाडे यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेत सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचे कळते. गाडे हे प्रतिनियुक्तीवर मंत्री कार्यालयात कार्यरत होते; आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात वर्ग करण्यात आली आहे. लाचखोरी प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS