बीड : रामचरित्र हे संसारी जीवनासाठी आदर्श असून प्रभू श्रीराम सर्वांगाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे मित्रही रामासारखा असावा आणि शत्रूही

बीड : रामचरित्र हे संसारी जीवनासाठी आदर्श असून प्रभू श्रीराम सर्वांगाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे मित्रही रामासारखा असावा आणि शत्रूही रामासारखा असावा, असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनी केले.
श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत बंकट स्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दुसर्या दिवसाचे कथापुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प. नाना महाराज कदम, ह.भ.प. सुरेश महाराज जाधव, ह.भ.प. दिनेश महाराज काळे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती. महाराजांच्या मुखातून रामकथेचे रसाळ वर्णन ऐकताना भाविक मंत्रमुग्ध झाले. श्रीराम जय राम जय जय राम या नामघोषाने संपूर्ण कीर्तन मंडप दुमदुमून गेला. आपल्या प्रवचनात संजय महाराज म्हणाले की, प्रभू श्रीराम हे आदर्श राजा, भाऊ, पुत्र, मित्र आणि शत्रू यांचे उत्तम उदाहरण आहेत. समाजात दुर्जन आहेत म्हणूनच सज्जनांचे महत्त्व अधोरेखित होते. जसे खाणीत गारगोटी व कोळसा असल्यामुळे हिर्याची किंमत वाढते, तसेच जंगलात विविध वनस्पती असल्यामुळे चंदनाचे महत्त्व अधिक जाणवते. माणसाने कधीही निंदा करू नये, कारण निंदा करणार्याकडे सर्व पापे आकर्षित होतात. जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. देश, देव आणि धर्मासाठी आयुष्य समर्पित करणार्या महापुरुषांच्या पुण्यतिथी अशा उत्साहात साजर्या होतात. त्यामुळे प्रत्येकाने परोपकार व सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहावे, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS