Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंबागणेश येथील त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने उत्साही सांगता

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिरात श्रीगुरू ईश्वरभारती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरि

नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव
माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता
तलवाडा येथे अधिकमासानिमित्त श्री महारूद्र हनुमान कथेचा प्रारंभ

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिरात श्रीगुरू ईश्वरभारती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह व भावार्थ रामायण कथा सप्ताहाची सांगता शनिवार, दि. 02 रोजी शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात करण्यात आली.
दि. 30 एप्रिल ते 02 मे या कालावधीत पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव भारती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशी शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंग ओव्यांच्या माध्यमातून भावपूर्ण व सुश्राव्य कीर्तन सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मळे, भोग सुखाचे सोहळे या अभंगाचा संदर्भ देत त्यांनी भगवंताच्या संगतीचे महत्त्व अधोरेखित केले. संत साहित्याच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नतीचा संदेशही त्यांनी दिला. सप्ताह काळात ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर व ह.भ.प. प्रेममुर्ती धर्मराज दादा सामनगावकर यांनीही सुश्राव्य कीर्तन सेवा दिली. या त्रिदिनी सप्ताहात काकडा, भजन, शिवलीलामृत पारायण, गाथा पारायण, भावार्थ रामायण, हरिपाठ, हरिकीर्तन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप प्रसंगी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

COMMENTS