Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरा येथे श्रीराम कथेचे आयोजन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त तसेच श्रीसाई उत्सव तपपूर्ती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली सोमवार दि. ४ मे  ते सोमवार दि. ११ मे २०२६ या कालावधीत रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक (नागपूर) यांच्या वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा दररोज सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत बाजारतळ, देवळाली प्रवरा येथे रंगणार असून विविध प्रसंगांवर आधारित कथा सादर केली जाणार आहे. मंगळवार दि. ५ मे रोजी ग्रंथ महात्म्य व शिव-पार्वती विवाह, बुधवार दि. ६ मे रोजी श्रीराम जन्म, गुरुवार दि. ७ मे रोजी सीता स्वयंवर, शुक्रवार दि. ८ मे रोजी केवट कथा, शनिवार दि. ९ मे रोजी भरत-राम भेट, तर रविवार दि. १० मे रोजी लंका दहन, रावण दहन व श्रीराम राज्याभिषेक आदी प्रसंगांचे विवेचन होणार आहे.  सोमवार दि. ४ मे रोजी कथेच्या प्रारंभदिनी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांची सोसायटी डेपो ते धर्ममंडप अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. कथेची सांगता सोमवार दि. ११ मे रोजी सायंकाळी ७ वाजता महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई प्रतिष्ठानच्या वतीने देवळाली प्रवरा व राहुरी तालुक्यातील भाविकांना करण्यात आले आहे.

सावधान! शिर्डीत गाडीची काच फोडून चोरी करण्याची नवी पद्धत आली समोर, साईभक्तांनी सतर्क राहण्याचे आवाहन
बेलापूर-वळदगांव रस्त्याची दुरवस्था;अवजड वाहनांनमुळे रास्ता खराब; नागरिकांकडून कारवाईची मागणी
कोपरगाव शहरात नालेसफाई मोहिमेस प्रारंभ

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील श्री साई मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त तसेच श्रीसाई उत्सव तपपूर्ती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली सोमवार दि. ४ मे  ते सोमवार दि. ११ मे २०२६ या कालावधीत रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक (नागपूर) यांच्या वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा दररोज सायंकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत बाजारतळ, देवळाली प्रवरा येथे रंगणार असून विविध प्रसंगांवर आधारित कथा सादर केली जाणार आहे. मंगळवार दि. ५ मे रोजी ग्रंथ महात्म्य व शिव-पार्वती विवाह, बुधवार दि. ६ मे रोजी श्रीराम जन्म, गुरुवार दि. ७ मे रोजी सीता स्वयंवर, शुक्रवार दि. ८ मे रोजी केवट कथा, शनिवार दि. ९ मे रोजी भरत-राम भेट, तर रविवार दि. १० मे रोजी लंका दहन, रावण दहन व श्रीराम राज्याभिषेक आदी प्रसंगांचे विवेचन होणार आहे.

 सोमवार दि. ४ मे रोजी कथेच्या प्रारंभदिनी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांची सोसायटी डेपो ते धर्ममंडप अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. कथेची सांगता सोमवार दि. ११ मे रोजी सायंकाळी ७ वाजता महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई प्रतिष्ठानच्या वतीने देवळाली प्रवरा व राहुरी तालुक्यातील भाविकांना करण्यात आले आहे.

COMMENTS