Homeताज्या बातम्या

गोपाल पैंजणे यांची प्रहार संघटनेतून हकालपट्टी; कार्याध्यक्षांची कारवाई, तालुकाध्यक्ष पदासह सदस्यत्वही गेले

बीड : प्रहार जनशक्ती संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष गोपाल पैंजणे यांच्याविरोधातील कथित व्हायरल ऑडिओ प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेल्या विविध तक्रारी

सरफराज नवाब काझी यांची शिवसेना अल्पसंख्याक विभाग बीड जिल्हाप्रमुखपदी निवड; केज येथे भव्य सत्कार
वीजप्रश्नांवर आमदार सुरेश धस आक्रमक; महावितरणला तातडीने उपाययोजनांचे अल्टिमेटम
अल्पसंख्याक संरक्षण कायद्यासाठी संघर्ष समितीचा बीड जिल्हा दौरा यशस्वी; लवकरच राज्यव्यापी जनजागृती अभियान
Viral Audio Clip: कसब्यात प्रचाराला या, 7 हजार रुपये मिळावा! 'ऑडीओ' क्लिप  व्हायरल|Viral Audio Clip: Candidates are paying 7 thousand rupees to people  to come to election campaign

बीड : प्रहार जनशक्ती संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष गोपाल पैंजणे यांच्याविरोधातील कथित व्हायरल ऑडिओ प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेल्या विविध तक्रारींची दखल घेत अखेर संघटनेच्या वरिष्ठांनी मोठी कारवाई केली आहे. गोपाल पैंजणे यांना तालुकाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले असून संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वातूनही निष्कासित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रहार संघटनेत मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपासाठी निधी मागणी केल्याचा कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची वृत्तपत्रांनी दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संघटनेच्या वरिष्ठांकडे तक्रारींचा ओघ वाढला होता. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून या संदर्भात सविस्तर माहिती मागविण्यात आली होती.

दरम्यान, प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष महेंद्र ऊर्फ बल्लू जवंजाळ यांनी जारी केलेल्या पक्षादेशानुसार गोपाल पैंजणे यांना माजलगाव तालुकाध्यक्ष पदावरून कमी करण्यात आले आहे. तसेच त्यांना संघटनेतून निष्कासित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षादेशात संघटनेचे ध्येय, धोरण आणि उद्दिष्टांचे पालन करण्यात अपयश आल्याचा तसेच आर्थिक स्वरूपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही कारवाई प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. यापुढे गोपाल पैंजणे यांचा संघटनेशी कोणताही संबंध राहणार नसून त्यांनी संघटनेच्या नावाचा किंवा पदाचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

पद आणि सदस्यत्व दोन्ही गेले प्रहार संघटनेने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार गोपाल पैंजणे यांना केवळ तालुका प्रमुख पदावरून हटविण्यात आलेले नाही, तर संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्वातूनही निष्कासित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे त्यांचा संघटनेशी कोणताही कायदेशीर किंवा राजकीय संबंध राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

COMMENTS