Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा येथे अधिकमासानिमित्त श्री महारूद्र हनुमान कथेचा प्रारंभ

तलवाडा : गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथील श्री महारूद्र हनुमान मंदिरात अधिकमास (भगवान पुरुषोत्तम मास) निमित्त धार्मिक कार्यक्रमाला उत्साहात प

माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता
भैरवनाथ नगरातील शिवमहापुराण कथेचा समारोप; काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता

तलवाडा : गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथील श्री महारूद्र हनुमान मंदिरात अधिकमास (भगवान पुरुषोत्तम मास) निमित्त धार्मिक कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने सोमवार, दि. 18 मे 2026 पासून हभप मधुसूदन महाराज गवारे (माऊली संस्थान, राजापूर फाटा) यांच्या अमृततुल्य वाणीतून श्री महारूद्र हनुमान कथेचे वाचन सुरू झाले आहे.
ही कथा रविवार, दि. 24 मे 2026 रोजी काल्याच्या कीर्तनाने संपन्न होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी कथा श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिकमासाच्या औचित्याने मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 7 ते 8 हनुमान महापूजा व आरती, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, तर रात्री 8 ते 11 या वेळेत मधुसूदन महाराज गवारे यांच्या वाणीतून कथेचे निरुपण सुरू आहे. समारोपाच्या दिवशी रविवार, दि. 24 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर गावकर्‍यांसाठी पारंपरिक ‘धोंडे जेवण’ स्वरूपात महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या संपूर्ण धार्मिक सोहळ्याचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS