Homeताज्या बातम्या

अखेर जुना मोंढा टॉवरची घडी पुन्हा धावलीपत्रकार किशोरकुमार वागदारीकर यांच्या वर्षभराच्या लढ्याला यश

नांदेड शहराच्या ऐतिहासिक वारशाचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानल्या जाणार्‍या जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेली घडी अखेर पुन्हा कार्यान्वित झाली आ

वक्फ मंडळाचे अद्यावत संग्रहालय पुन्हा पर्यटकांच्या सेवेत सुरूसंशोधनासाठी एक हजार पुस्तकांचे वाचनालयही लवकरच सुरू होणार
भुदरगड पंचायत समितीकडून खा. लंके यांच्या अभिनंदनाचा ठरावभुदरगड संवर्धनासाठीच्या कार्याची दखल
ऐतिहासिक रस्ता, चौक, वास्तूस भूषण देशमुखांचे नाव द्यावे : गुगळे  



नांदेड शहराच्या ऐतिहासिक वारशाचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानल्या जाणार्‍या जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेली घडी अखेर पुन्हा कार्यान्वित झाली आहे. पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते किशोरकुमार वागदारीकर यांनी तब्बल वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने नांदेडकरांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जुना मोंढा टॉवरवरील घड्याळ बंद अवस्थेत होते. शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणार्‍या या वास्तूवरील घडी बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती. नांदेडच्या ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या या ऐतिहासिक घडीचे अस्तित्व जपण्यासाठी किशोरकुमार वागदारीकर यांनी विविध शासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. महानगरपालिका प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, नगरविकास विभाग तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे वारंवार निवेदने, स्मरणपत्रे आणि पत्रव्यवहार करून त्यांनी हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर संबंधित प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेत घडीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि ती पुन्हा सुरू करण्यात आली. अनेक वर्षांनंतर टॉवरवरील घड्याळाचे काटे पुन्हा फिरू लागल्याने जुना मोंढा परिसरातील व्यापारी, नागरिक, इतिहासप्रेमी आणि ज्येष्ठ नांदेडकरांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतन-संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे. टॉवरवरील घडी पुन्हा सुरू होणे ही केवळ यांत्रिक दुरुस्ती नसून नांदेडच्या इतिहासाला, परंपरेला आणि शहराच्या अस्मितेला दिलेला मान असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. वर्षानुवर्षे थांबलेले काळाचे काटे पुन्हा गतिमान झाल्याने नांदेडच्या वैभवशाली परंपरेची हरवलेली शान नव्या उत्साहाने परतल्याचे चित्र आज शहरात पाहायला मिळत आहे.

COMMENTS