Homeताज्या बातम्या

दिल्लीतील आंदोलन केवळ नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार

मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोध

कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या निधीमध्ये कोट्यवधींची लूट; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी
प्रियदर्शनी प्राथमिक व राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
मानवजिगरा सोन्नर यांचे तब्ब्ल 100 वेळा रक्तदान; डॉ. अंजली बांगर यांनी केला सत्कार
Chandrashekhar Bawankule Statement On Delhi Protest | BJP Politics

मुंबई: राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी रचलेली निव्वळ ‘नौटंकी’ आहे, असा थेट आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

एवढेच नव्हे तर, आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यासाठी तब्बल २ ते ३ ट्रक भरून गोठे (दगड) आणले गेले होते, असा खळबळजनक दावाही बावनकुळे यांनी केला. यामागे असलेल्या असामाजिक घटकांची कसून व कडक चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

COMMENTS