Homeताज्या बातम्याअहमदनगर

श्री अबॅकस क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

कोपरगाव शहर : अबॅकस हे गणितातील मोजणीसाठी वापरले जाणारे एक प्राचीन साधन म्हणून ओळखली जाणारी एक महत्वाची क्रिया असून याला मण्यांची पाटी देखील म्हट

संजीवनी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना नोकरी
गौतम पब्लिक स्कूलमध्ये बटालियनचा प्रशिक्षण कॅम्प
उद्या कोपरगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कोपरगाव शहर : अबॅकस हे गणितातील मोजणीसाठी वापरले जाणारे एक प्राचीन साधन म्हणून ओळखली जाणारी एक महत्वाची क्रिया असून याला मण्यांची पाटी देखील म्हटले जाते. याचा मुख्यत्वे वापर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या महत्वाचा गणिती क्रिया करण्यासाठी केला जातो. जगभरात मोठ्या प्रमाणात हा अभ्यासक्रम सुरू असून कोपरगाव येथिल श्रीकृष्ण नगर जेऊर पाटोदा येथे सुरू असलेल्या अबॅकस क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका सचिव तथा सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा. विजय कापसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.श्री क्लासेसच्या अबॅकस मधील विद्यार्थ्यांची पहिली स्टेजची परीक्षा नुकतीच संपन्न होऊन यात श्रेया विशाल धारणगावकर, नव्या विशाल धारणगावकर, स्वरा विवेक गोंदकर, तन्वी सचिन गायकवाड, प्राची हेमंत लकारे, दिक्षा विकास रणधीर व स्माही मनोज कदम या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर प्रसंगी क्लासेसच्या सर्वेसर्वा प्रा. विशाल धारणगावकर व प्रज्ञा धारणगावकर यांनी अबॅकस क्लास विषयी सविस्तर माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे पत्रकार विजय कापसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत धारणगावकर दाम्पत्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

COMMENTS