Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मौत का खड्डा : 4 चिमुकल्यांचा बळी, जबाबदार कोण?महापालिकेतील अधिकारी की ठेकेदार? आता माफी नको, थेट कारवाई हवी!

नांदेड : नांदेड शहर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हादरले आहे. देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या मागील बाजूस नाली बांधकामासाठी ख

गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘निर्णायक प्रहार’; 22 गुंडांवर एमपीडीए, पाच टोळ्यांवर मोक्काची टांगती तलवार
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’मध्ये 43 लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड : नांदेड शहर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हादरले आहे. देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या मागील बाजूस नाली बांधकामासाठी खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले असून संतप्त नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे-या निरपराध बालकांच्या मृत्यूस जबाबदार कोण? महापालिकेतील अधिकारी की संबंधित ठेकेदार?
या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावांसह चार निष्पाप मुलांनी आपला जीव गमावला. खेळण्याच्या वयातील मुलांचे मृतदेह बाहेर काढताना परिसरात आक्रोश उसळला. पालकांचा टाहो, नागरिकांचा संताप आणि प्रशासनाची नेहमीची मौन भूमिका असे चित्र घटनास्थळी पाहायला मिळाले. मुलांनी खड्ड्याकडे जाणे चुकीचे होते, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न काहीजण करतील. मात्र प्रश्न असा आहे की, दहा फूट खोल खड्डा कोणाच्या परवानगीने उघडा ठेवण्यात आला? त्याभोवती सुरक्षा जाळी का नव्हती? इशारा फलक कुठे होते? परिसरात बांबू बॅरिकेड्स का लावण्यात आले नाहीत? पाणी साचू दिलेच कसे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने द्यावी लागणार आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधील इस्लामपुरा भागात सुरू असलेल्या नाली कामात अत्यंत बेफिकिरीने खोदकाम करून खड्डा उघड्यावर ठेवण्यात आला होता. पावसाचे व नाल्याचे पाणी साचून तो अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला. तरीही ना अधिकारी फिरकले, ना ठेकेदाराने खबरदारी घेतली. परिणामी चार कुटुंबांवर आयुष्यभराचे दु:ख कोसळले. ही पहिली घटना नाही. देगलूर नाका भागात यापूर्वी ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मालटेकडी भागातही तत्सम दुर्घटना घडली. त्या वेळीही चौकशी, आश्वासने, जबाबदारी निश्चितीचे नाटक झाले; पण प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. त्यामुळेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांचे मनोबल वाढले, असा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेफिकीर कारभाराने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्ते खोदून ठेवणे, नालीची कामे अर्धवट टाकणे, सुरक्षा उपाययोजना न करणे आणि नंतर दुर्घटना घडल्यावर माफी मागणे-हा प्रकार आता जनतेला मान्य नाही. नागरिकांनी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून महापालिकेतील कार्यकारी अभियंता, साईट इंजिनियर आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. चार निष्पाप जीव परत येणार नाहीत. मात्र या मृत्यूला कारणीभूत असणार्‍यांना शिक्षा झाली, तर भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा बसेल. अन्यथा उद्या पुन्हा एखादा खड्डा, पुन्हा एखादी दुर्घटना आणि पुन्हा चार घरांचा आक्रोश-हेच वास्तव राहील. नांदेडकरांचा एकच आवाज – आता शोकसभा नको, थेट कारवाई हवी!

COMMENTS