नांदेड : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा रविवार, 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील एकूण 46 परीक्षा केंद्

नांदेड : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा रविवार, 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत जिल्ह्यातील एकूण 46 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर, परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. दि. 3 मे रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत परीक्षार्थी तसेच परीक्षा कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही या परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हा आदेश 1 मे रोजी निर्गमित केला आहे. तसेच, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व सुरळीतता राखण्यासाठी खालील बाबींवरही बंदी घालण्यात आली आहे. गणकयंत्र, रेडिओ, संगणक (लॅपटॉप) व तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगणे किंवा वापरणे परीक्षा केंद्रात अशी साधने नेणे परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सार्वजनिक दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर व ध्वनिक्षेपक यांचा वापर प्रशासनाने नागरिकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS