Homeताज्या बातम्या

‘संजीवनी’ हा केवळ संस्थांचा समूह नसून एक अखंड परिवार; आमदार विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन

कोपरगाव : संजीवनी हा केवळ संस्थांचा समूह नसून एक मोठा परिवार आहे. संजीवनीचे माजी विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच

संजीवनी पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांना नोकरी
संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी

कोपरगाव : संजीवनी हा केवळ संस्थांचा समूह नसून एक मोठा परिवार आहे. संजीवनीचे माजी विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच संजीवनी शैक्षणिक संकुलाची खरी आणि यशस्वी ओळख आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध संस्थांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, चीफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी अमित कोल्हे यांनी प्रास्ताविक मनोगतात सांगितले की, आमदार विवेक कोल्हे यांची गुणवत्तेवर (मेरीटवर) विधान परिषदेवर निवड होणे ही बाब संजीवनी परिवारासाठी अभिमानाची आहे. आमदार कोल्हे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला अधिक उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, मला मिळालेले यश हे केवळ माझे वैयक्तिक यश नसून संजीवनी परिवारातील प्रत्येक सदस्याचे यश आहे. माझी निवड ही विधान परिषदेवर आमदार म्हणून झाल्याने माझे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि त्यात मोठे योगदान देण्यासाठी मी सभागृहात सक्रिय भूमिका बजावेन, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.

COMMENTS