Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’चा दणका : नांदेड ग्रामीण पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पाच जण रंगेहात ताब्यात

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत लिमरा हिल्स कॉलनी

गाजावाजा न करता एलसीबीत बदल; अतुल भोसले यांच्या खांद्यावर गुन्हेगारी रोखण्याची मोठी जबाबदारी
गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘निर्णायक प्रहार’; 22 गुंडांवर एमपीडीए, पाच टोळ्यांवर मोक्काची टांगती तलवार
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’मध्ये 43 लाखांचा अवैध शस्त्रसाठा जप्त

नांदेड : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत लिमरा हिल्स कॉलनी परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पाच जणांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल आणि जुगार साहित्य असा एकूण 1 लाख 42 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार, मटका आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. मंगळवारी सायंकाळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना एका गोपनीय माहितीदारामार्फत लिमरा कॉलनीतील बंधारा ब्रिज परिसरात काही जण हार-जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काहीजण पसार होण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख शौकत शेख बाखर (60), शेख बरकत शेख बशीर (43), मोहम्मद सुबाहान मोहम्मद खाजा (55), शेख अनवर शेख छोटेमियाँ (52) आणि शेख जाहेद शेख नजीर (43) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे विविध भागातील रहिवासी असून मजुरीचा व्यवसाय करतात. घटनास्थळावरून पोलिसांनी 5 हजार 300 रुपये रोख रक्कम, 52 बदकछाप पत्ते, एक मोटारसायकल आणि पाच मोबाईल जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत 1 लाख 42 हजार 300 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शंकर रेवण माळगे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तेलंग हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक व्यंकट कुसमे यांच्यासह वसंत केंद्रे, विनोद पवार, मारोती पंचलिंग, शंकर माळगे, समीर अहमद, सचिन चावरे आणि धम्मपाल कांबळे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध जुगार व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळात अशाच प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

COMMENTS