Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ‘सरडा’ म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा!सरकार सरडे पालनासाठी अनुदान देणार काय? – डॉ. गणेश ढवळे

बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्‍यांच्या हस्

बेंगळुरूमध्ये गारांचा पाऊस; तळपत्या उन्हात शहराला काश्मीरचे स्वरूप
मान्सूनपूर्व पावसाचा कोपरगाव, नेवाशाला तडाखा; शेतीचे नुकसान; वीजपुरवठा खंडित; झाडे कोलमडली
येवला तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस

बीड : बीड येथील छत्रपती संभाजी क्रीडांगणावर 1 मे ते 5 मे दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात राजकीय पुढार्‍यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी विकास प्रतिष्ठान, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मात्र, या कृषी प्रदर्शनात शेतीसंबंधित आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत शेती पद्धती किंवा शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणारे उपक्रम यांना प्राधान्य देण्याऐवजी दक्षिण अमेरिकेतील साडे 5 फुटी ‘इग्वाना’ जातीच्या सरड्याला मुख्य आकर्षण म्हणून पुढे करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर या सरड्याचे मोठमोठे होर्डिंग्ज लावून त्याची जाहिरात करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड जिल्हा हा सततच्या अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांमुळे संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन अपेक्षित असताना, अशा प्रकारचे आकर्षण ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या योजनांप्रमाणे सरकार आता सरडे पालनासाठीही अनुदान देणार आहे काय? असा उपरोधिक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबाणेशकर) यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय, शेतकर्‍यांच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनासाठी 50 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असून, यामुळे या उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची क्रूर थट्टा केली जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराकडे कृषी विभाग डोळेझाक करत असल्याचा आरोप होत असून, शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

COMMENTS