Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात

अमृत उद्योग समूह सेवानिवृत्त कर्मचारी संघ कार्यालय सुरू

संगमनेर ः संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमधील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच

जिल्ह्यातील विकास कामांबरोबर निळवंडेही रखडले
बोगस बियाणेप्रकरणी कंपन्यांवर कारवाई का नाही ?
थोरातांकडे येणार प्रदेश काँगे्रसची सुत्रे ?

संगमनेर ः संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमधील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन हे नाते असेच कायम राहण्यासाठी कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुका व अमृत उद्योग समूह हा एक परिवार असून सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी असणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहातील सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे कार्यालय सुरू करण्यात आले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सर्व संचालक, भास्कर पानसरे व विविध संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका आणि अमृत उद्योग समूह एक परिवार आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेक जणांच्या भेटी दुर्मिळ होतात मात्र परिवार म्हणून घट्ट नाळ असल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात ही अत्यंत आनंददायी बाब आहे. या सर्वांचा कायम समन्वय राहावा आणि अडचणी सुखदुःखात एकत्र यावे याकरता या मध्यवर्ती कार्यालयाचा नक्कीच सर्वांना उपयोग होईल असेही ते म्हणाले. विविध सहकारी संस्थांमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक कर्मचारी आपल्या गावी स्थायिक असतात. अशावेळी मुलांचे लग्नकार्य, आजारपण, घरगुती कार्यक्रम, यामुळे जुने मित्र यांना भेटणे, समारंभांना निरोप देणे, सुखदुःखात सहभागी होऊ देने अशा बाबतीत अनेकांना अडचणी येतात. यामुळे सर्वांचा समन्वय व्हावा तसेच काही कर्मचार्‍यांना आजारपणात मदत व्हावी याकरता हे कार्यालय नक्कीच काम करेल असा विश्‍वास कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी व्यक्त केला. यावेळी विविध संस्थांमधील अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते अनेकांनी बर्‍याच दिवसांनी भेटल्यानंतर हस्तांदोलन करत एकमेकांना गळा भेट दिली.

COMMENTS