Homeताज्या बातम्या

मुस्लिम सेवा संघाचा स्तुत्य उपक्रमगरीब विद्यार्थ्यांना मोफत कपडे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

बीड : मुस्लिम सेवा संघाच्या वतीने बीड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू शाळकरी मुला-मुलींन

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या राज्य प्रवक्तेपदी मुशीर इनामदार यांची निवड
स्वच्छता सभापती शेख निजाम यांना स्वच्छतेसंदर्भात निवेदन देताना महिला शहराध्यक्ष रेहाना पठाण, नगरसेवक खुर्शीद आलम व शेख रईस उपस्थित होते
बार्शीनाका रेल्वे स्टेशनचे कामा सह बीड ते मुंबई पुणे सुरू होणार- खा. सोनवणेसंपादक भंडारीच्या मार्गदर्शनात, खुर्शीद आलम यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीची बैठक


बीड : मुस्लिम सेवा संघाच्या वतीने बीड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू शाळकरी मुला-मुलींना मोफत कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला.
समाजसेवा, शिक्षणाचा सन्मान आणि पर्यावरण संरक्षण या तीनही उद्देशांचा संगम साधणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मुस्लिम सेवा संघाचे फिरदौस सर यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना नवीन कपडे देण्यात आले. कपडे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सामाजिक जबाबदारी म्हणून उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लावलेली झाडे जगविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुरुजनांचा विशेष सत्कार करण्यात आला. ’युवा लोकमित्र’ वृत्तपत्राकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल कुर्लेकर सर यांचा तर आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शायदा बाजी यांचा मुस्लिम सेवा संघाच्या महिला राज्याध्यक्षा मा. मुमताज मॅडम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हकीम मणियार होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक खुर्शीद आलम उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचा सन्मान, गरजूंना मदत आणि पर्यावरणाचे रक्षण हे समाज प्रगतीचे महत्त्वाचे पाऊल आहे. मुस्लिम सेवा संघाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी मुस्लिम सेवा संघाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक फारुक मणियार सर, रियाज सिद्दिकी सर, रफीक अत्तार सर, मजीद खान, मोहसीन भाई यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS