Homeव्हिडीओ

आमदार प्रशांत बंब यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वसई-विरारमध्ये हिंदू-मुस्लिम खाटीक समाज एकवटला; जाहीर माफीची मागणी करत दिले तीव्र आंदोलनाचे संकेत.

https://youtu.be/m56iW0XPF5E विधिमंडळात खाटीक समाजाची दुकानदारी बंद करण्याची मागणी करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात वसई-विरारमध्य

बेलापूर बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षभिंतीतील भगदाड अद्याप कायम; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा
स्मार्ट मीटर बसविताना अनियमितता झाल्याचा ‘वंचित’चा आरोप 
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन करणार; पेपर लीक प्रकरणावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तीव्र संताप!

विधिमंडळात खाटीक समाजाची दुकानदारी बंद करण्याची मागणी करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात वसई-विरारमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. वसई-विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खाटीक समाज मटण विक्रेता संघाचे अध्यक्ष कॅप्टन निलेश पेंढारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार प्रशांत बंब यांचे वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे आणि खाटीक समाजाला हीन ठरवणारे आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. संविधानाने दिलेला व्यवसाय करण्याचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. तसेच, अशा पद्धतीची वक्तव्ये न थांबल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि बंब यांनी खाटीक समाजाची माफी मागावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS