तामसा : हदगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मौ.डाक्याचीवाडी येथील आदिवासी नागरिकांनी 9 ऑगस्ट 2026 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष

तामसा : हदगाव तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मौ.डाक्याचीवाडी येथील आदिवासी नागरिकांनी 9 ऑगस्ट 2026 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
9 ऑगस्ट 1982 रोजी संयुक्त राष्ट्र संघात आदिवासींच्या हक्कांवर पहिली ऐतिहासिक बैठक पार पडली होती. याचे औचित्य साधून डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला. 2026 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आदिवासी सुईणींचा सन्मान: जीवन आणि कल्याणाची रक्षा’ ही मुख्य संकल्पना निश्चित केली आहे. आदिवासी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे आणि जल-जंगल-जमिनीच्या रक्षणातील त्यांच्या योगदानाचा आदर करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
आज जगभरासह महाराष्ट्रातील विविध भागांत जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील डाक्याचीवाडी या आदिवासी बहुल गावामध्ये सकाळपासूनच पारंपरिक वाद्ये आणि नृत्यांच्या गजरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास रामचंद्र भिसे, उत्तम झाडे, डॉ. संजय मुरमुरे, प्रभाकर कोठले, रंगराव डोखळे, नागोराव खरोडे, राम भिसे, शंकर मुरमुरे, काशिनाथ झाडे, जिगाजी वानोळे, सरपंच साळवे, राजू पोलिस पाटील, मंगलाबाई मुरमुरे, पंचफुला मुरमुरे, मीराबाई भिसे, अंजुबाई झाडे यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS