Homeताज्या बातम्या

बेलापूर बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षभिंतीतील भगदाड अद्याप कायम; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

 बेलापूर :  बेलापूर येथील बसस्थानकाची दुरवस्था आणि बसस्थानकाच्या मागील भिंतीत अज्ञात व्यक्तीने पाडलेल्या भगदाडाकडे लक्ष वेधूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या मागील संरक्षक भिंतीत भगदाड पाडले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पत्रकार देविदास देसाई व दिलीप दायमा यांना दिल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर आगार प्रमुख तसेच अहिल्यानगर येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून भगदाड बुजविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत या संदर्भात कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.सध्या या भगदाडाचा वापर नागरिकांकडून ये-जा करण्यासाठी केला जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या राहत असून परिसराचे ‘खाऊ गल्ली’त रूपांतर झाल्याचे चित्र आहे. बसस्थानक परिसरात अनधिकृत जाहिरातीही लावल्या जात आहेत. विशेष म्हणजे बसस्थानकात स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने भिंतीतील भगदाडाच्या परिसराचा वापर अस्वच्छतेसाठी होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.बसस्थानकावर महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.यापूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार मारुतीराव रशिनकर, पत्रकार देविदास देसाई व दिलीप दायमा यांनी बसस्थानकाची पाहणी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तरीही प्रश्न प्रलंबितच राहिल्याने आता या मागण्यांसाठी लोकआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात वसई-विरारमध्ये हिंदू-मुस्लिम खाटीक समाज एकवटला; जाहीर माफीची मागणी करत दिले तीव्र आंदोलनाचे संकेत.
मिलींद नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातसांडपाण्यासह गटारीचेही पाणी रस्त्यावर
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप

COMMENTS