कुंडलवाडी : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुंडलवाडी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-यु

कुंडलवाडी : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुंडलवाडी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील गुणवंत विद्यार्थी व शासकीय सेवेत निवड झालेल्या युवक-युवतींचा पालकांसमवेत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले आहे.
इयत्ता दहावीच्या 2026 च्या परीक्षेत कुंडलवाडी केंद्रातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणारे तसेच शहरातील प्रत्येक शाळेतून प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी तसेच इयत्ता बारावीच्या 2026 च्या परीक्षेत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी, व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट)-2026 द्वारे वैद्यकीय, आयुर्वेद, दंतवैद्यक व होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविलेले विद्यार्थी आणि संयुक्त प्रवेश परीक्षा, भारतीय तंत्रज्ञान संस्था व महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. सन 2025-26 मध्ये शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कुंडलवाडी शहरातील युवक-युवतींचाही सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची प्रत, प्रवेशाचा प्रवेश निश्चितीचा पुरावा तसेच आवश्यक कागदपत्रे कर्मचारी समन्वयक अंजूकुमार गटूवार यांच्याकडे 12 ऑगस्टपूर्वी जमा करावीत. नगराध्यक्षा प्रेरणाताई गजानन कोटलावार यांनी पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून सत्कार सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS