https://youtu.be/H7OpYk_EnHM मुंबईत टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा
मुंबईत टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणी एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा ताफा थेट अडवला . एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वात हे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री भुसे यांच्या गाडीसमोर काळे झेंडे फडकावले आणि ‘दादा भुसे राजीनामा द्या’ अशा घोषणा देत रस्ता पूर्णपणे जाम केला. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याचे आवाहन केले असून, राजीनामा न दिल्यास विद्यार्थी आणि युवकांचा संताप आणखी वाढेल असा थेट इशाराही दिला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एनएसयुआयच्या या आक्रमक आंदोलनामुळे राज्यातील शिक्षण विभागातील गैरव्यवस्थेचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS