Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुनकवाड येथे धुनकेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

वडवणी : धुनकवाड येथील ग्रामदैवत असलेल्या धुनकेश्वराची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात ध

वार्षिक मालमत्ता कर आकारणी कमी करण्याची मागणी; ग्राहक पंचायतचे नगराध्यक्षांना निवेदन
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी 90 कोटींचा निधी मंजूर; खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा होणार कायापालट
धनसंपत्तीपेक्षा संतसंग श्रेष्ठ असून त्यातूनच खरा आनंद मिळतो :- शिवदास महाराज जंगलेधुनकवाडमध्ये शिवदास महाराजांची प्रभावी कीर्तन सेवा.

वडवणी : धुनकवाड येथील ग्रामदैवत असलेल्या धुनकेश्वराची वार्षिक यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
धुनकवाड नं.1 येथून पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत यात्रेची सुरुवात करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेली ही भव्य मिरवणूक धुनकवाड नं.2 येथे पोहोचली. या वेळी कावडी व काठी घेऊन भक्तांनी जल्लोषात सहभाग नोंदवला. यात्रेदरम्यान तरुणांनी लेझीम सादर करत वातावरण अधिक रंगतदार केले. हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळाला. यानंतर मिरवणूक महादेव मंदिरात पोहोचली, जिथे विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. धुनकेश्वराच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या यात्रेनिमित्त धुनकेश्वर देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. धार्मिक परंपरा जपत गावकर्‍यांनी एकोप्याने ही यात्रा साजरी केल्याने धुनकवाड गावाची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

COMMENTS