Homeताज्या बातम्या

नाम फाउंडेशनच्या वॉटर एटीएममुळे १२ गावांना स्वच्छ पाण्याचा दिलासा; ७५ लाखांचा प्रकल्प

आष्टी : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून आष्टी

आष्टीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावाप्रलंबित रस्ते तातडीने पूर्ण करा; दर्जेदार कामांना प्राधान्य-आ.सुरेश धस
एल निनोच्या संकटात शेतकऱ्यांनी घाबरू नये, वैज्ञानिक पद्धतीने शेतीचे नियोजन करावे – आ. सुरेश धस
राज्य गुणवत्ता यादीत 8 वा क्रमांक; कु. प्रांजल पोकळे शिष्यवृत्ती धारक

आष्टी : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि दर्जेदार पिण्याचे पाणी गावातच उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून आष्टी तालुक्यातील १२ गावांमध्ये वॉटर एटीएम उभारण्यात आले आहेत. यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले असून कारखेल खुर्द, दौलावडगाव, म्हसोबाचीवाडीसह अन्य गावांतील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. मात्र गावातच वॉटर एटीएम सुरू झाल्याने नागरिकांना अवघ्या ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. नाम फाउंडेशनने ग्रामीण भागातील ५६ हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये वॉटर फिल्टर एटीएम उभारण्याचा उपक्रम राबवला असून, यामुळे महिला, बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबली आहे. आष्टीसारख्या दुष्काळी व दुर्गम भागात हा प्रकल्प ग्रामस्थांसाठी वरदान ठरत आहे. भविष्यात या यंत्रणांची देखभाल सुरळीत व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाममात्र दराने हे पाणी दिले जात आहे.

प्रतिक्रिया: “ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे ही काळाची गरज आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी व्हावेत, यासाठी नाम फाउंडेशनने हा उपक्रम राबवला आहे. ज्या गावांमध्ये हे प्रकल्प सुरू झाले आहेत, तेथे नागरिकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येत आहे.” – तानाजी मोहिते (समन्वयक, नाम फाउंडेशन)

COMMENTS