Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी 90 कोटींचा निधी मंजूर; खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, 15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा होणार कायापालट

बीड : जिल्ह्यातील शहरी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 90 कोट

अंबाजोगाई येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन सादर
धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन

बीड : जिल्ह्यातील शहरी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल 90 कोटी 83 लाख 9 हजार 453 रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर करण्यात आला आहे. 15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना हा निधी वितरित केला जाणार असून, यामुळे जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानाला मोठी चालना मिळणार आहे. निधी दिल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
या भरीव निधीमुळे शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता यंत्रसामग्री, आधुनिक घंटागाडी व्यवस्था, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या या निधीचा थेट वापर शहरांमधील आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी केला जाणार आहे. प्रामुख्याने शहरांमध्ये साठणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक प्रकल्प उभारणे.ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खत किंवा ऊर्जा निर्मिती करणे. स्वच्छतेसाठी लागणारी अत्याधुनिक वाहने, सक्शन मशिन्स आणि उपकरणे खरेदी करणे. प्रत्येक प्रभागातील गल्लोगल्लीपर्यंत कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवणे. नागरी भागांमध्ये प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण आणि हरित पट्टे विकसित करणे आदि कामांसाठी निधी खर्च केला जाणार आहे. सन 2023-24, 2024-25 आणि 2025-26 असा निधी यावेळी मिळालेला आहे. मागील दोन वर्षात हा निधी मिळालेला नव्हता. आता एकाच वेळी मोठा निधी उपलब्ध झाल्याने नागरी विकासाची मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागणार आहेत.
वर्षनिहाय मंजूर निधीचा तपशील
सन 2023-24 करीता निधी, बीड नगर परिषद: 7,53,81,389, परळी नगरपरिषद: 4,67,44,384, माजलगाव नगरपरिषद: 2,54,09,728, गेवराई नगर परिषद: 1,72,44,683, धारूर नगर परिषद: 1,04,90,575, पाटोदा नगरपंचायत: 85,13,413, आष्टी नगरपंचायत: 61,51,402
सन 2024-25 करीता निधी
बीड नगर परिषद: 15,93,11,967, परळी नगरपरिषद: 9,87,90,164, अंबाजोगाई नगर परिषद: 8,03,29,787, गेवराई नगर परिषद: 3,64,45,128, केज नगरपंचायत: 3,33,41,613, धारूर नगर परिषद: 2,21,70,913, पाटोदा नगरपंचायत: 1,79,92,352, आष्टी नगरपंचायत: 1,30,00,449, शिरूर नगर पंचायत: 63,04,762
सन 2025-26 करीता निधी
बीड नगर परिषद: 8,43,45,503, परळी नगरपरिषद: 5,23,03,077, अंबाजोगाई नगर परिषद: 4,25,29,487, माजलगाव नगर परिषद: 2,84,31,372, केज नगर पंचायत: 1,76,52,253, धारूर नगर परिषद: 1,17,38,081, पाटोदा नगरपंचायत: 95,25,800, वडवणी नगरपंचायत: 71,77,264, आष्टी नगरपंचायत: 68,82,907
केंद्र सरकारचे मानले आभार
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एवढा मोठा आणि भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय वित्त मंत्रालय तसेच भारत सरकारचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत. या निधीमुळे जिल्ह्यातील शहरांचे रूप पालटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. बीडचा आवाज बनून संसदेत मी प्रत्येक प्रश्न आणि इथल्या गरजा प्रभावीपणे मांडत आलो आहे. जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी आणि नागरिकांना सर्व आधुनिक सुविधा मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरतपणे कायम राहतील.
-खा.बजरंग सोनवणे, लोकसभा मतदारसंघ-बीड.

COMMENTS