Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य शिक्षण संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर; 198 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बीड : आदित्य शिक्षण संस्थेअंतर्गत आदित्य डेंटल शाखेच्या वतीने समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने भव्य रक्तदान शिब

बीड पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांचा शिक्षक संघाकडून भव्य सत्कार
बीडच्या रेल्वे प्रश्नांसाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती आक्रमकप्रशासनाला सहकार्याचा निर्णय; पदाधिकार्‍यांची निवड, बीड-पुणे रेल्वेची मागणी करणार
संत बंकटस्वामीच्या 73 व्या फिरत्या नारळी सप्ताहास मोठ्या उत्साहात सुरुवातआठ दिवस श्रीक्षेत्र मांडवखेल मध्ये अवतरणात भक्ती पंढरी..संत बंकटस्वामींची तेजस्वी ओजस्वी परंपरा – श्रीहरी महाराज पवार..

बीड : आदित्य शिक्षण संस्थेअंतर्गत आदित्य डेंटल शाखेच्या वतीने समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सी.ए. गिरीश गिल्डा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सी.ए. गिरीश यांनी आपल्या मनोगतात  रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येकाने या कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उर्जा आणि दिशा मिळाली. या शिबिरात आदित्य शिक्षण संस्थेमधील विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. शिबिरात एकूण 198 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. शिस्तबद्ध नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांच्या कार्यतत्परतेमुळे संपूर्ण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत सर्व रक्तदाते, आयोजक आणि सहभागी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संचालिका डॉ. आदिती सारडा  यांनी आपल्या संदेशात सांगितले की, अशा प्रकारचे सामाजिक आणि मानवतावादी उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करतात. भविष्यातही अशा उपक्रमात अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन डॉ. हिमांशू श्रीवास्तव यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने समन्वय साधत हा उपक्रम सुरळीतपणे पार पाडला. रक्तदात्यांच्या नोंदणीपासून ते वैद्यकीय तपासणी आणि रक्तसंकलनापर्यंत सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पडली. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.  रक्तदान हे सर्वात मोठे दान असून यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. अशा उपक्रमाचा भाग होता आले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो -प्रेम रवी पोगे (विद्यार्थी) समाजासाठी काहीतरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. पुढील काळातही अशा सामाजिक उपक्रमात नक्की सहभागी होण्याचा माझा मानस आहे.-प्रीती सत्यम बोडके (विद्यार्थिनी)

COMMENTS