Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी; 4.65 लाखांचा महसूल

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 23 एप्रिल रोजी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. विनातिकीट व

पुणे शहरात खंडणीप्रकरणात पीएसआयसह तिघांवर गुन्हा
बांद्र्यातील कारवाईनंतर राजकारण तापले; बेकायदेशीर घरं आणि मशिदींवर चालणार हातोडा; नितेश राणे पुन्हा आक्रमक
NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णीच्या अवैध मालमत्तेवर थेट हातोडा। लोकमंथनNews२४
Hazur Sahib Nanded Railway Station Forum/Discussion - Railway Enquiry

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात 23 एप्रिल रोजी सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. रितेश यांच्या मार्गदर्शनाखाली 29 तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी 31 गाड्यांची तपासणी केली. तपासणीत एकूण 746 प्रकरणे आढळून आली असून त्यातून 4 लाख 65 हजार 695 इतका महसूल वसूल करण्यात आला. यामध्ये विनातिकीट प्रवासाची 616 प्रकरणे, अनियमित प्रवासाची 56 प्रकरणे आणि बुक न केलेल्या सामानाची 74 प्रकरणे समोर आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा व नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS