माहूर : माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमात परंपरेनुसार दि. 15 मे ते 15 जून 2026 या कालावधीत अधिक मासानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात

माहूर : माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमात परंपरेनुसार दि. 15 मे ते 15 जून 2026 या कालावधीत अधिक मासानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विराट अन्नदान सोहळा आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन सुबक व पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी पूर्वतयारी निमंत्रण बैठक पार पडली.
ही बैठक आश्रमाचे मठाधीश, महाराष्ट्र शासनाचे ब्रँड म्बेसेडर व स्वच्छता दूत राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली, श्री रेणुका देवी संस्थानचे पुजारी व ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी साईनाथ महाराज यांनी अधिकाधिक भाविकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. साईनाथ महाराज म्हणाले की, भारतीय संस्कृतीत पुरुषोत्तम अधिक मासाला विशेष महत्त्व असून या काळात जप, तप, नामस्मरण आणि दानधर्म यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. या अनुषंगाने दत्तधाम आश्रमात संपूर्ण महिनाभर ‘नगर भोजन’ (अन्नदान) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत भजन, कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच अन्नदान महाप्रसादासाठी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. हा उपक्रम सर्वांचा असून प्रत्येकाने आपल्या परीने सहकार्य करून या ज्ञानयज्ञ व अन्नदान यज्ञात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले. या बैठकीपासूनच अधिक मास कार्यक्रमाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाल्याचे साईनाथ महाराज यांनी सांगितले. यावेळी श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त व पुजारी संजय कान्नव, अरविंद देव, दुर्गादास भोपी, दीपक कान्नव, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनिल कान्नव, आश्रमाचे प्रवक्ते भाऊ पाटील हडसणीकर, दिलीप पांडे, अभिजित फांदाडे, अमोल रीठे, नंदकुमार जोशी, अनिल कोरटकर, श्रीपाद जगत, कृष्णा बेलखोडे, अपिल बेलखोडे, रेणुका दास बेलखोडे, सतीश कान्नव, मुळजकर, सुभाष महाजन, रंगनाथ लीगदे, शेषेराव पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय आमले यांनी केले, तर अनुदीप कोरटकर यांनी आभार प्रदर्शन केले.

COMMENTS