Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि

पेपरफूट प्रकरणात चार डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात
निदा खान प्रकरणात नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महापालिकेची नोटीस; ‘मिसिंग’ मुलींच्या प्रकरणावरून आरोप
अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाच्या बेकायदा घरावर प्रशासनाने चालवला बुलडोझर
ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी निलंबित; विकासकाला 60 कोटींचा फायदा  करून दिला | Saamana (सामना)

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा प्राथमिक ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बोरिवली तालुका हद्दीतील काही भूखंडांच्या संपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. संबंधित प्रकरणात भूखंड क्रमांक 455, 456, 457 आणि 458 या जमिनींच्या मूल्यांकनात नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे निदर्शनास आले. जमिनीचा मोबदला निश्‍चित करताना बाजारातील प्रचलित दराऐवजी सदनिकांच्या विक्री व्यवहारांचे दर ग्राह्य धरल्याने अवास्तव मूल्यांकन झाले. याशिवाय, भारग्रस्त जमिनींसाठी आवश्यक असलेली वजावट न करता थेट दर निश्‍चित करण्यात आल्याने सरकारी तिजोरीला आर्थिक फटका बसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रक्रियेत काही लाभार्थ्यांना अनुचित फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे. उपायुक्त बिरारी यांच्या कार्यकाळात इतरही काही वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती. विशेषतः शील फाटा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात ढिलाई दाखवण्यात आल्याचा आरोप सातत्याने होत होता. या भागात बेकायदा बांधकामे वाढत असताना प्रभावी कारवाई झाली नसल्याने प्रशासनावर टीका होत होती.

COMMENTS