मुक्रमाबाद : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 709 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन व महाप्रसाद सोहळा अत्यंत

मुक्रमाबाद : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 709 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन व महाप्रसाद सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला. ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या रसाळ व प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. कीर्तनादरम्यान महाराजांनी ‘भक्त शिरोमणी गोरोबा काका’ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सांगितले की, भक्ती ही केवळ कर्मकांडात नसून ती निस्वार्थ कर्म आणि सेवाभावात असते. त्यांच्या विचारांनी भाविकांमध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण झाली. कीर्तनानंतर गुलालाची उधळण करत संत गोरोबा काकांचा जयघोष करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या नामघोषात संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्यात वारकरी संप्रदायातील भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवाजी ठेंगेटोल, बालाजी घटकार, नारायण मिरगुडे, मारुती बिचकुंदे, बारसोले यांच्यासह गावातील तरुण मंडळ व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी विशेष परिश्रम घेतले. मुक्रमाबाद शहरासह परिसरातील वाड्या-वस्त्यांमधून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. महाप्रसादाचे वाटप कीर्तनाची सांगता झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता, ज्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झाले. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि श्रद्धेने पार पडलेल्या या पुण्यतिथी सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत असून, मुक्रमाबादमध्ये पंढरीसारखे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS