Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आई-वडिलांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य-शांतीब्रह्म नवनाथ बाबा; ब्रम्हनाथ वस्ती येथे हरिकीर्तन उत्साहात संपन्न

बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जग

वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न
भैरवनाथ नगरातील शिवमहापुराण कथेचा समारोप; काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता
नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव

बीड : आज संपूर्ण वारकरी संप्रदाय जो दिसत आहे, त्यामागे पंढरपूरातील पुंडलिकाची आई-वडिलांप्रती असलेली सेवा हीच प्रेरणा आहे. आई-वडिलांची सेवा हेच जगातील सर्वात मोठे पुण्य आणि सर्वोच्च ईश्वरभक्ती आहे, असे प्रतिपादन शांतीब्रह्म नवनाथ बाबा यांनी केले.
ब्रम्हनाथ वस्ती येथे आयोजित हरिकीर्तन सेवेत अभंगाच्या भावार्थाचे विवेचन करताना त्यांनी वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पंढरपूर नगरीचे आणि भगवान विठ्ठलांच्या भक्तीचे मूळ कारण म्हणजे पुंडलिकाने केलेली आई-वडिलांची सेवा होय. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत सावता माळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार आणि संत चोखामेळा यांच्या संतपरंपरेचा उल्लेख करत वारकरी संप्रदायाच्या विचारांची महती सांगितली. आजचा तरुण वर्गाने आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. आई-वडिलांच्या सेवेत संपूर्ण जगाचे हित दडलेले आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कीर्तन सोहळ्यास टाळकरी, माळकरी, वीणेकरी, मृदंगवादक, पेटीवादक तसेच शेकडो महिला-पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.

COMMENTS