Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

बीड : समाजसुधारणेचा क्रांतिकारी विचार मांडणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर य

महामानवांचा समतावादी विचार आपण अंगिकारला पाहिजे-आ.विजयसिंह पंडित; गेवराईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिवादन
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘शिवा’ची भव्य मिरवणूक; विचारमंथनातून समाजप्रबोधन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

बीड : समाजसुधारणेचा क्रांतिकारी विचार मांडणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती विजेता करिअर अकॅडमी येथे अत्यंत उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात केवळ हार-तुरे अर्पण करण्याऐवजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करून या महामानवांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारसरणीचा अंगीकार करून समाजात समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी खरात आडगाव येथील माजी सरपंच सीताराम साळवे, पौळ सर तसेच गावातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जयंती सोहळ्याचे आयोजन यशवंती आधार सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संचलित विजेता करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश दिवटे सर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकत शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे अधोरेखित केले.

COMMENTS